टाईम्स ऑफ इंडिया मध्ये आज एक न्यूझ वाचली ८ महिन्यापूर्वी सुरु झालेली pulse कॅन्डी, या महिन्यात १०० करोड चा टप्पा गाठून गेली. योग्य जागा बघून आणि गरज ओळखून आपल्या प्रोडक्टची योग्य प्लेसमेंट करून प्रेरणा देणारे अप्रतिम उदाहरण. कच्चा आम अशी branding करून हार्ड बॉईल्ड प्रकारात येणारी कॅन्डी ही उद्योगात नवीन येणाऱ्या सोबतच आईडिया (Concept) मध्ये स्वतःला नाविन्यपूर्ण ठेवणाऱ्या प्रत्येकाला आणि चिरेबंदी झालेल्या मार्केटला फोडून, कसे स्वतःचे स्थान एवढ्या कमी अवधीत निर्माण केल्या जाऊ शकते याचे हे जबरदस्त उदाहरण … ! एकूणच हार्ड बॉईल्ड प्रकारातील जवळपास २ हजार करोडच्या मार्केटला २५% ग्रोथमध्ये महत्वपूर्ण हातभार या प्रोडक्ट ने लावलाय, मला आनंद या गोष्टीचा आहे की जे लोक नाविन्याची आणि गरजेची चव ओळखतात, भारतीय लोक त्याची “चव” ठेवतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलंय.
रस्ते बंद झाल्यावर आपण काय करतो, प्रत्येक जन आपल्या क्षमतेनुसार परिस्थितीचा मुकाबला करतो काही थांबतात, बदलतात, समजुन घ्येतात, ओरडतात, घाबरतात, घबरवतात, पळतात आणि बरयाच इतर प्रतिक्रिया ...... आणि काही लोक नविन रस्ताच बांधायला घ्येतात. प्रसिद्ध लेखक, कवयत्री 'माया अन्जेलो' आपल्या आत्मचरित्रात ( The Best Advice I Ever Got) तीला तिच्या आजीकडून आयुष्यात मिळालेल्या महत्वपूर्ण सल्ल्याबद्दल सांगते, "जगाने तुला अशा मार्गावर जबरदस्ती ढकलले जे तुला करायला मुळीच आवडत नाही, जेव्हा तू समोर बघतेय आणि तुला सांगण्यात आलेले गंतव्य (destination) तुला बिलकुल अपेक्षित नाही, आणि जेव्हा तू मागे वळून पाहते तेंव्हा जिथून तू सोडून आली आहेस तिथे तुला मुळीच जायचे नाहीये, तेव्हा; रस्त्यावरून बाहेर पड आणि स्वतःचा मार्ग बांध".
ज्यांच्या मार्गात दगड आहेत त्यांनी ते बाजूला करायच्या फंदात पडत बसु नका; एवढंच लक्षात असु द्या ... नविन रस्ता तयार करायला पहिल्या थरावर हीच दगड कामाला येतील....!
सचिन दाभाडे ...
No comments:
Post a Comment