Tuesday, May 17, 2016


चित्र काढ़ताना ते केव्हा पूर्ण होणार आणि शेवटचा ब्रश कुठल्या रंगाचा असणार हे फ़क्त ते काढणाऱ्या चित्रकारलाच माहिती असत. इमारत बांधत असताना तिचा कॉन्ट्रेक्टरच सांगू शकतो की इमारत नेमकी कोणत्या क्षणाला परिपूर्ण होणार. एखादी बेस्ट डिश बनवत असताना शेफच सांगू शकतो की तिच्यात शेवटचे इंग्रेडिएंट काय व कसे पडणार. म्हणायचे एवढेच की गोष्टी सुरु करण्यासाठी झटताना तिचा शेवट आपल्या डोक्यात असतो का ?.

आपल्या आयुष्यच्या स्वप्नाचे मनोरे उभे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या घटनामध्ये आणि त्याच्या प्लानिंग मध्ये काय येऊ शकते हे फ़क्त आणि फक्त स्वतलाच माहिती असते, तसे असेल तरच सुरु झालेली गोष्ट इछीत मुक्कामापर्यंत पोहचू शकते, अन्यथा हिल स्टेशन वर तर जायचे आहे पन, रस्ता आणि स्टेशनच माहित नसने याचा शेवट 0 ला मोठ्या संख्येने गुणल्यासारखेच.! (back to square) आणि त्यात पुन्हा चालकावर भरोसा ठेवणे म्हणजे एडमिन ला सीईओ बनवन्यासारखे.अशी सहल आनंद तर देते पन मर्यादित, बऱ्याच वेळेस हा आनंद जबरदस्तीने शोधून शोधून काढावा लागतो.

सचिन दाभाडे

No comments:

Post a Comment