Tuesday, May 17, 2016


मला कुठल्या व्यक्तिने किती वेळ द्यावा हे सर्वस्वी समोरच्या व्यक्तिवर अवलंबून असूनही बरेच लोक त्याबद्दल त्रागा करून घ्येतना मी नेहमी पाहतो, त्यापैकी काही महत्वा चे वाक्ये अशी "मला काही महत्वच नाही", "माझ्यासाठी वेळच कुणी काढत नाही", "मला नहीं वाटत मी तेवढा महत्वपूर्ण आहे", किंवा या संबधित आणखी काही परिप्रेक्ष्य (approach).

जूलिएट सीझर मध्ये शेक्षपिअर एक घटना मांडतो; सीझर हा त्या काळातील माहित असलेल्या सर्वात भव्य साम्राज्याचा अविवादित अधिपति, कुठलीही गोष्ट तोंडात येन्या अगोदर पायावर पडलेली, प्रत्येक पुरुषाला आपण त्याच्यासारखच व्हाव; असा ! आणि प्रत्येक स्त्रिला आयुष्यात हवा असणारा सक्षम जोड़ीदार असा तो महान सम्राट, मग जूलियट, जी त्याला अनेक चाहणाऱ्यापैकी एक, या सर्वात आपले स्थान कुठे शोधत असणार?. तिने एक ठरवले की सिझर जेव्हां तिच्यासोबत वेळ घालवेल त्यात ती प्रचंड आनंदी राहील, हसेल, विनोद करेल, हे तिचे वागणे प्रचंड दबाव आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या महान सम्राटाला त्याच्याकडे काहीतरी नसल्याची जाणीव करुण देत राहील, कारण ती त्याला असे काही देणार होती, जे एका सुपिक आणि दूरदृष्टि असलेल्या मेंदुतुनच येऊ शकते.
तिच्या या अश्या वागण्यामुळे सिझरला, आनंद आणि सुखात फ़क्त जूलिएटचिच आठवण यायला लागली आणि तिच्याकडे जाण्यासाठी त्याच मन धाव घ्येउ लागले, मग ते अगदी कुठल्याही परस्थितित!.
लक्षात घ्या.आपल्या प्रत्येकात एक अविस्वासनीय चुंबक (magnet) आहे आणि जे जे तुमच्याकडे नाहिये आणि तुम्हाला हवय ते मिळवण्यासाठी फ़क्त सहजतेने वागा, प्रमाणिक प्रयत्न ठेवा, तूम्हाला काहीही आपल्याकडे ओढण्याचि गरज नाही, फक्त आपली कृति सामान्य, सरळ ठेवा, बस्स ! लोक तुम्हाला शोधत येतील।

तुमच्या हातात असलेल्या वेळात तुम्हाला काय करायचे आहे आणि किती मापात (extent) मधे करायचे आहे हे तुमचे भविष्यावरील प्रभुत्व सिद्ध करेल.

सचिन दाभाडे

No comments:

Post a Comment