Thursday, May 26, 2016

मुन्नाभाई मूवी मध्ये बापू मुन्नाला सर्किट ची माफ़ी मागायला सांगतात, तेंव्हा त्याला कळते की एखाद्याला मारण्यापेक्षा त्याची माफ़ी मागने किती अवघड ..! अतिशय भावनिक प्रसंगात मुन्ना माफ़ी मागताना सगळ्याच्याच् डोळ्यातुंन पाणी आणतो... सीन आठवतो? काय आहे एवढं अवघड माफ़ी मागण्यात, फ़क्त दोन शब्द तर म्हणायचेय 'माफ़ कर' पण तरीही आयुष्य निघुन जाते, जवळचे हातातून दूर जातात, तडजोड करायला ही आपण तयार होतो पण आपल्याला कुणाची तरी गरज आहे हे मान्य करायला मन काही धजत नाही, मग ज्ञान आणि माहिती आभावी नष्ट झालो तरी चलते.
मानसशास्त्रीय दृष्टया माफ़ी मागने म्हणजे आपण फक्त स्वतः चूक आहोत एवढेच मान्य करत नाही तर समोरच्याची आपल्या आयुष्यातील गरजही अधिरेखित करत असतो (i need you). हे कमकुवत पनाचे लक्षण का मानले जाते हे समजने अवघड आहे ..!. आपल्याला समोरच्याची गरज आहे हे आपण किती वेळा स्पष्टपणे बोलतो ?, व्यवहारिक जगतात मी बऱ्याचदा असे अनुभवले, लीडरशिप आपल्या सोबत किंवा खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडून मदत मागने कमी प्रतिचे समाजते.

म्हणून आज हा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय I know everything या अविर्भावात नेतृत्वाने किंवा ध्येयवादी व्यक्तिने वावरणे कितपत योग्य ?

सचिन दाभाडे

No comments:

Post a Comment