रविवारची सकाळ …. मस्त … फ्रेश अनुभव असतो ,काहीतरी झणझणित, तडका मारलेले लिहिण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहते पण … मन मात्र पुन्हा पुन्हा काही तरी मुलभूत लिह्ण्याकडेच धाव घ्येते … तुम्हाला नेहमिसाठीच आराम मिळवा व् आयुष्यभरासाठी स्थिर व्ह्यवे हा विचार मनात येणे, ह्या किती मुलभूत मानवीय गरजा. पण पुन्हा पुन्हा प्रत्येक वळणावर आपण थांबत योग्य दिशेने चाललोय का? आपल्या क्षमता या मार्गाने वापरल्या जाणार आहेत का? हे प्रश्न तुमच्या स्थिर होण्याच्या मानसिक गरजेला व कृतीला पुन्हा पुन्हा आव्हान देत असतात. म्हणजे बघा ना एखाद्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एखादा हाईवे तयार असने किंवा तयार करने हे निश्चितच आनंदाचे कारण; पण कित्येक आनंदाच्या आडवाटा आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत याचीही तजवीज आपण करून ठेवतोच, नाही का? खरंच भारतीय लोकांसाठी सिनेमा हे नेहमीच विचार करायला लावणारे मध्यम, मलाही खूप धवळून निघाल्यासरख होत काही चांगले पाहिल्यावर, अर्थात: मी हे ठरवतो, काय पाहायचे आणि काय नाही, इम्प्तीयाझ अली हा असाच एक अवलिया जो मला नेहमी भावतो त्याच्या कलाकृतितुन. त्याच्या सिनेमानंतर बाहेर उठून आल्यावर तुम्हाला नेहमी काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत राहते. लातूरला असेच एकदा ट्रेनिंग साठी गेल्यावर त्याचा "तमाशा" पहिला, आणि अस्वस्थ करून गेला …
मला वाटते प्रत्येक वळणावर आपल्या क्षमतेला कुणी दुसर्याने प्रश्न केल्याऐवजी आपण स्वतःच का करू नये,म्हणजे कामातून पैसा आणि पैश्यातून पुन्हा काम, अशी योजनाच तुम्हाला तुम्ही आता करत असलेल्या कामाच्या भविष्यातील abjective पर्यंत घ्येउन जाईल. नाहीतर या उदाहरणातील व्यापार्यासारखे होईल. एक यशस्वी व्यापारी त्याचा उद्योग विकून टाकतो आणि आलेल्या पैशातून कित्येक पिढ्या आरामात बसून खातील म्हणून आलेला पैसा फार्म हाउस बांधने, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे आणि आयुष्यभर पैश्यातून व्याज मिळत राहील याची व्यवस्था करून स्वस्थ बसतो. पण अचानक एक दिवस तो त्याच्या संपत्तीचे नियोजन करणाऱ्या व्यवस्थापकाकडे जातो आणि पुन्हा एक व्यवसाय विकत घ्येण्याची गरज बोलून दाखवतो. व्यवस्थापक आश्चर्याने चकित होतो, कि इतक्या लवकर हे वळण का घ्येतले गेले, कारण एवढा भरमसाठ पैसा असताना एक नवीन व्यवसाय विकत घ्येण्याची गरज का भासली असावी ! व्यापाऱ्याने उत्तर दिले कि "मला माझ्या मुलाचे लग्न करायचे आहे आणि कुठलाही शहाणा व्यक्ती त्याची मुलगी काहीहि काम करत नसलेल्या व्यक्तीला पण घरात फ़क्त पैसाच असलेल्या मुलास देण्यास तयार नाही ".
No comments:
Post a Comment