आक्सिडेंटमध्ये पाय फ्रैक्चर झाल्यावर आपण पायावर बैंडेज बाधून आराम करतो, त्याला बरे होऊ देतो. झालेली जखम तुम्ही नाकारत नाही,किंवा मला लागलच नाही असा आविर्भावही नसतो. हीच प्रतिक्रिया मानसिक धक्या (mental damage) बाबत होते का? याबाबत मात्र आपण काहीच घडले नाही असे ढोंग करताना नेहमीच दिसतो. बाहेरून स्वतःला स्टेबल प्रोजेक्ट करतांना आतल्या अस्वस्थतेला धूमारे फूटत असतात. मानसिक गोष्टिना याच पद्धतीने हाताळायची सवय तुम्हाला जडली असेल, तर एखाद्या दिवशी अचानक येणाऱ्या मोठ्या भावनिक भूकंपाची तयारीही करुण ठेवायला हरकत नाही.
शारीरक डॅमेज झालेले असताना तुटलेले हाड़ फरपटत घ्येउन फिरताना आपण विचारहि करू शकत नाही, इथे शारीरला मात्र वेळ दिला जातो. हेच मानसिक धक्का मिळालेला असताना घडले आणि स्वताला बर(heal) होण्यास वेळ दिला, तर तुमच्या रिटायरमेंट चा कालावधि वाढवता येऊ शकेल. एक उदाहरण देण्यासारखे आहे.
"माइंड ट्री" चे फॉर्मर सीईओ आपल्या ब्लॉग वर आमिर खानच्या वर्किंग स्टाइल आणि दूरदृष्टीचे उदा देऊन म्हणतात. एका सुपरस्टारला वर्षातून कमीत कमी 3 ते 4 सिनेमे बनवणे गरजेचे आहे. त्यात एखादा हिट होणेही तितकेच आवश्यक, असे असताना एक वर्षात, एक वेळी, एकच सिनेमा, ही स्ट्रेटजी स्पर्धेतून बाद झाल्याचा मेसेज देण्यासारखिच, तरीही हा पट्ठा पॅरेलल नसलेल्या भूमिका करून यशाचे नवे मानके स्थापित करतो आणि पुन्हा स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रमाणिकपणे जातो, वेळ घ्येतो, वेळ देतो...आणि परत जेव्हा येतो ते नवे आणि सक्षम काही तरी घ्येउनच.
सचिन दाभाडे...
No comments:
Post a Comment