Thursday, May 26, 2016


बर्कशायर हाथवे चे CEO वारेन बफेट आपल्या याहू ला दिलेल्या एक मुलाखतीत म्हणतात कि माझ्या कंपनीचे MD "थामस मर्फी" यांनी मला दिलेला एक सल्ला माझा निर्णय प्रक्रियेला बदलवणारा ठरला. मला थामस म्हणाला होता "वारेन एखाद्या व्यक्तीला तू मुर्ख आहेस असे म्हणणे हा तुझा अधिकार आहे आणि तू तो केव्हाही वापरू शकतोस, पण मला वाटते तो तू राखून ठेवायचा प्रयत्न कर, आणि तोंड अश्या वेळी बंद ठेवत जा आणि हे बघत जा की, आणखी काही दिवसानंतरही तुला त्या व्यक्तीबद्दल असेच म्हणावे वाटते का".

मनात आले म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल मी एखादी कॉमेंट करून टाकतो किंवा रागाने व्यक्त ही होतो, जसे काही आपले संबंध हे फक्त त्या व्यक्ती बरोबरच संपुष्टात येणार आहे आणि बाकीच्यासोबत माझे सर्व सुरळीतच चालणार, त्यावर याचा काही प्रभाव पडणार नाही, असा काहीसा भाव असतो. आपल्या व्यक्तिमत्व विकासात आणि नातेसंबंधाच्या विकासात नेमकी याची जागा सकारात्मक कि नकारात्मक ? व्यवसाय करत असताना आणि नोकरीच्या ठिकाणी टीम हाताळत असतांना कुठल्या प्रकारच्या अडचणी उभ्या राहणार आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त करण्याआधी त्याच्या विषयी आपले विशिष्ट धोरण झाले आहे म्हणून आपण त्याला असे बोलतो आहोत काय? आणि तसे असेल तर असे धोरण आपण का स्वाकारले आहे याची जाण आपल्याला आहे का ? त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज आहे का ? बहुतांश वेळी तो नसतोच.हे सर्व कसे समजून घ्यावे यासाठी विविध ट्रेनिंग आणि खूप उपयुक्त अशी पुस्तके आज बाजारात आहे, मुद्दा आहे जे योग्य आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार कसे. महाविद्यालयात असताना बरीस्च अशी पुस्तके वाचल्या गेली की जी वाचल्यावर कळायचे की या पेक्षा दुसरे वाचले असते तर फायदा झाला असता, पण आर्थात वेळ निघून गेलेला आसायाचा. त्यामुळेच, गडबडीत काहीतरी वाचून वेगळ करण्यापेक्षा सर्वेक्षण करून आणि विशिष्ठ मार्गदर्शन घ्येउन वाचलेलं हे नेहमी मजबूत ढाचा उभे करण्यासाठी योग्य. पुस्तकासोबतच काही चांगल्या वेबसाईट ही यात तुम्हाला मदत करू शकतील.

एखाद्या व्यक्तीला प्रतिसाद देताना आपण त्याच्या सर्व बाजू किती विचाराधीन घ्येतो,आपले प्रतिसाद हे समग्र बाबींचा विचार करून झालेले असतात का?. अन्यथा कमकुवत नातेसंबंधाची पायाभरणी आपण करत आहोत याची जाणीव ठेवा. बऱ्याच वेळेला आपली धडक अश्या हिमनगालाही दिल्या गेलेली असते ज्याचा अंदाज लावताना फक्त २०%भागच आपण लक्षात घ्येतलेला असतो, अश्या वेळी तुमच्या भविष्याची टायटनीक होण्याची शक्यता जास्त… ! "मी अमुकला आज हे बोलून टाकले", "आज मी त्याला त्याची खरी जागा दाखून दिली" यासंबंधीची वाक्ये मी नेहमी ऐकतो. या वाक्यामध्ये प्रश्न सोडवण्या ऐवजी ते निर्माण करण्यावर जास्त भर असतो. Serco मध्ये असताना माझे सहकारी मला नेहमी, "सचिन तुझी चर्चा करण्याची आणि नातेसंबंध जपण्याची शैली म्हणजे Go with the flow ", तुला चुकीला चूक आहे असे स्पष्टपणे सांगता येत नाही का, मी म्हणायचो, मी चूक म्हणेलही, पण आज चूक म्हणालो आणि त्याने उद्या ते तसेच योग्य करून दाखवले म्हणजे… !

सांगायचा मुद्दा हाच कि आपल्या घरात टीवीच्या जागेपेक्षा पुस्तकाची जागा जास्त असू द्या… !

सचिन दाभाडे… !

No comments:

Post a Comment