एखादा पेपरवाला रोज न चुकता पेपर टाकतो, दूधवाला न चुकता दूध आणतो, तुम्ही कधी आपल्या माहित असलेल्या व्यक्तिकडे आपले एखादे इलेक्ट्रॉनिक चे गॅझेट सुधारायला घ्येउन गेले आहात काय ? त्याने जेव्हा यात एखादी गोष्ट बदलावि लागेल असे म्हंटल्यावर आपण त्याला कुठलाही विचार न करता होकार कळवतो, अशी अनेक छोटी मोठी उदाहरणे देता येतील जिथे आपण खरे काय आहे, याची शाहानिशा न करताच समोरचा म्हणेल तसे फॉलो करतो, याचे कारण तुम्हाला मिळणारी सेवा ही चांगली किवा वाईट म्हणून नाही तर तीची विश्वासहार्तेचि मोजमापे तुम्हाला माहित असते.
तुम्ही सर्विस प्रोवाइडर म्हणून केव्हा काय बोलता याचा अर्थ तुमचा कस्टमर लावू शकने म्हणजे ऑथेंटिसिटी.
ही विश्वासहर्ता (authenticity) तुमच्या प्रोफेशन चा अविभाज्य भाग बनल्यावर तुमचा खरा प्रोफेशनल म्हणून उदय होतो.

लक्षात ठेवा, विश्वासहार्ता म्हणजे; काय चूक किंवा काय बरोबर याचे गणित नाही, तर तुम्ही जे आहात जसे आहात तेच तुमच्या रोजच्या प्राक्टिस मध्ये येणे होय .
सचिन दाभाडे..
No comments:
Post a Comment