लहानपणी मला आई नेहमी उगाच फुगू नको म्हणायची, ती हे तेव्हाच म्हणायची जेंव्हा, मी एखादी महात्वाची गोष्ट करायला हातात घ्येतली किवा एखादी गोष्ट न पटल्यावर विरोध करताना. काय असेल याचा अर्थ, काय म्हणायचे असते आपल्या सहकाऱ्यांना आणि जवळच्याना. यामध्ये अर्थ दडलेला होता हे समजल्यावर अश्र्य्चाकीत झालो.
फुगणे (puffed up) हि प्रकिया तुमच्या आयुष्यात तेंव्हाच होते जेंव्हा तुम्ही घाबरलेले असाल आणि तुम्ही जे कधीच नसतात त्याचे ढोंग (pretend) करत असतात किंवा मग तुम्ही स्वताला larger extent मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करता तेंव्हा, प्राण्यामध्येही काही असे प्राणी असतात जे अशी वेळ आल्यावर फुगतात (puffed up) साप, बेंडूक, मासा, यासारखे प्राणी हे घाबरल्यावर आपला आकार बदलन्याचा प्रयत्न करतात, पण ती परिस्तिथी निघून गेल्यावर त्या आकाराचि गरज संपल्याने ते पुन्हा आपल्या मुळ रचनेत येतात. माणसे सुद्धा आपल्या आकारापेक्षा मोठे होऊन वागायला लागली कि त्यांच्या आयुष्यात अनावश्यक घटनांची नांदी सरू होते किवा ते अश्या गोष्टीची सुरुवात करतात ज्याचा शेवट लवकर होणार असतो. आणि मग त्यानंतर आलेला मुळ आकार निराशाजनक असतो.
त्यामुळे who am i ? हा प्रश्न रिलेशनशिप मॅनेजमेंट करताना महत्वाचा ठरतो .
हा प्रश्न नेहमी विचारा ..!
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment