भुवन लाकडाची फळी घ्येउन गावात असलेल्या मोकळ्या जागेत येतो, सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा भुवन वर खिळलेल्या, भुवन नेहमी प्रमाणे आपल्या सहज सोप्या लकबीत गावासमोर नवीन प्रात्यक्षिकांच्या तयारीसाठी सज्ज होताना आपल्या खुमखुमी असलेल्या भाषेत नविन येणाऱ्या आव्हानात संधी शोधन्याच्या त्याच्या पावित्र्यात बोलू लागतो. गोलू ला बॉल पकडायला सांगतो. किती सोप आहे हे सांगताना तो गोलुचि इच्छाशक्ति व् प्रेरणा वाढवत असतो. बॉल मारण्याच्या पावित्र्यात येऊन गोलुला बॉल टाकायला सांगतो, त्याच्याकडे पाहणाऱ्यांच्या नजरेत एकाच वेळेला निराशा, राग, अस्वस्थता....! या सगळ्याकडे थोडेसे दुर्लक्ष करत त्याचे लक्ष्य बॉलकड़े. गोलू वेगात बॉल भुवनच्या दिशेने भिरकावतो आणि त्याला उत्तर म्हणून आपल्या पूर्ण ताकदीनिशी भुवन फळी ने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण बॉल फळी ला न लागता निसटतो, भुवनच्या चेहऱ्यावर निराशेची थोडीशी लकेर, निसटलेला बॉल गौरीला आणायला सांगतो, तेवढ्यात गौरीच्या वडिलांकडून तिला भुवनला मदत करण्यास विरोध .
दुसऱ्या प्रयत्नसाठी पुन्हा भुवनची सज्जता .. एकुलता एक व्यक्ती गोलू ची साथ सुटू नये म्हणून गोलुला पुन्हा विश्वास देत बॉल फेकायला सांगतो, यावेळी पुन्हा बऱ्याच नजरेत थोड़ी फार आशा, काही साशंक, काही अस्वस्थ......आणि काही घाबरलेले ,सगळ्याच अर्धवट नजरा भुवनच्या पवित्र्याकडे...आणि भुवन पुन्हा प्रात्यक्षिकाच्या पावित्र्यात, पुन्हा बॉल भुवनच्या दिशेने आणि पूर्ण ताकद लावून यावेळेला पहिल्यांदा गेलेली इज्जत वाचवण्यासाठी भुवनचे फळी फिरवणे…. आणि पुन्हा गंभीर निराशा… ! हातातून फळी निसटून यावेळेला दूर जाऊंन पड़ते. आता मात्र बऱ्याच भूवया उंचावतत, अस्वाथता टोकाला, पराभव... पराभव... असेच काहीसे ….!
गोंधळलेला भुवन , बोललेला पूर्ण करू न शकलेला भुवन , अपयशी भुवन , अपरिपूर्ण भुवन , असक्षम भुवन, स्वताच्या स्वाभिमानासाठी सगळ्या गावकऱ्यांच्या आयुष्याला अडचणीत आणणारा भुवन; नजर चुकवत पुन्हा फळी कड़े जायला निघतो. आता हा घरी जाऊन फळी एका कोपऱ्यात ठेवून फुकाचे प्रात्याक्षिके नक्कीच करणार नाही असे एखाद्याच्या डोक्यात…। पुन्हा कॅमेरा भुवनकडे, फळी घामाने निसटल्याचे कारण देताना, अरे हा तर पुन्हा मैदानात, लोक आता हे अशक्य आहे अश्या भावत पुन्हा आपापल्या कामात लागताना, काहीजण आपण दुर्लक्ष करतोय याचे बेमालूम नाटक करताना, पण कान मात्र त्याच्या पुढच्या वाल्गनेकडे, त्याच्या शब्दाकडे, आणि अर्थात त्याच्या कृतीकडे.… !
तो पुन्हा फळी उचलताना काय म्हणतो हे ऐकण्यास, बघण्यास जणूकाही सर्वच इक्छुक. पुन्हा तो फळी उचलतो आता मात्र फळी हातातून सटकु नए म्हणून मातीत हात पूर्ण भरून घेतो, यावेळी बऱ्याच मुठी अवळलेल्या, नजरा ताणलेल्या, भुवया उंचावलेल्या, भुवनने उगारलेल्या फळी मध्ये भविष्य जणू. भुवन काय करतोय यांच्याशी आम्हाला कही घेणे नाही हा आविर्भाव सगळ्यांच्या नजरेतून गायबच, यावेळी. गोलू यावेळेला बॉल टाकताना जास्त सतर्क, आणि भुवनचि गर्जना "ईस बार मारेंगे और बहोत दूर तक मरेंगे ", सर्वांचे श्वास गळ्यात
आणि वेगाने येणाऱ्या बॉलला फळीने एक जबरदस्त स्ट्रोक......!
सचिन दाभाडे….