Sunday, October 1, 2017

जितना बड़ा संघर्ष, उतनी बड़ी जित...!


जितना बड़ा संघर्ष, उतनी बड़ी जित...!


एखाद्या सीनेमामध्ये व्हिलन खुप सामान्य किंवा कमकुवत असेल तर हीरो हा खुप क्षमतेचा दखवण्याची गरजच नसते. पण, जर हिरोला खुप मोठ्या कॉनव्हास वर दाखवायचे असेल तर काय करावे लागेल? साहाजिक आहे, की व्हिलन खुप मोठा, शक्तिशाली, प्रचंड दाखवावा लागेल; म्हणजे त्या विरोधात लढणारा हीरो हा मोठा दखवता येईल. कल्पना करा बाहुबली मध्ये भल्लालदेव हा कमकुवत दाखवला गेला असता तर बाहुबली चा संघर्ष हा एवढा रोमहर्षक झाला असता का...? बाहुबली हा आपल्या नजरेत बलशाली आणि आदरास पात्र ठरतो याचे एकमेव कारण तो ज्या शत्रुशी लढतो त्याची क्षमता सुद्धा असामान्य आहे.

याच प्रमाणे आपले सर्व आइडॉल पुन्हा आठवून पहा एक गोष्ठी सारखी सापडेल प्रत्येकाचा निवडला गेलेला शत्रु तेवढाच ताकदीचा, मग ते चन्द्रगुप्त, अशोका, बुद्ध असोत की पृथ्वीराज, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, बाबासाहेब, अब्दुल कलाम असोत, किंवा स्टीवजॉब्स, बिलगेट्स, लारी पेज, सॅम वाल्टन, कोलोनियल सांडर्स, अगदी ओप्रा विनफ्रे, डेनियल ब्रैंसन ते ओबामा पर्यंत सगळयाचेच शत्रु मोठे...तुमच्यातील पाणी पाहणारे.

जगातील मोठ्या वेंचर उभे करणारे सीईओ आणि फाउंडर आपल्या मनात प्रचंड मोठी आणि अदराची जागा निर्माण करुन जातात, कारण झोपडीपासून किंवा एखाद्या गैरेजमधे आपल्या कंपनीची सुरवात करणाऱ्या दरिद्री माणसापासूनचा ते, आपल्या क्षेत्रातले जागतिक लीडर बनण्यापर्यंतच्या त्यांचा प्रवास मनावर भुरळ घालतो. गरीबी, दारिद्र्य, आभाव या सारखे प्रबळ आणि भल्याभल्यानां आपली प्रेरणा विसरायला लावून जागा दखावनारे शत्रु त्यांनी निवडलेले असतात, म्हणून त्यांचा संघर्ष मोठा होतो... नंतर तो महान होत जातो. आणि या शत्रुशि चाललेली त्याची झटापट आपल्या मनात त्यांना हीरो करुन जाते..

गांधीजी जगातल्या कुठेही सूर्य न मवाळनारयां सम्राज्यासोबत झगड़ले, सोबतच तो स्वतःमधील सर्वात हिंस्र असणाऱ्या भावनेशि झगडले. त्यांनी दोन्ही शत्रु मोठे निवाडले, वकील म्हणून विरोधी वकीलही शत्रु म्हणून निवडू शकले असते, राजकारणातहि बरेच शत्रु गाँधीजीना मिळाले असते पण त्यांनी दोन्हीही शत्रु; एक आतला आणि एक बाहेरचा, तोडीचे आणि दुर्दम्य असेच निवडले. म्हणून तर गांधी महात्मा झाले असे की आइंस्टाइनला ही म्हणावे लागले की येणाऱ्या पिढ्यांना विश्चास बसणार नाही, गांधी नावाचा हाडामासाचा मानुस पृथ्वीवर होऊंन गेलाय.

तुम्हाला भेडसावणारया समस्या या गल्ली बोळातील आहेत क़ी व्यापक, क्षणिक आहेत की दीर्घ, कमकुवत आहेत की दणकट, वैयक्तिक की वैश्विक, सामान्य की असामान्य. जर तुमच्या आयुष्याच्या सिनेमातील व्हिलन मोठा, तकदीचा, आणि क्रूर, तितका तुमच्या आयुष्याच्या सिनेमा हिट....सुपर हिट..!

शत्रु हो बड़ा जिसको, मुश्किल हो करना चित।
नायक वही बने, जो समझे संघर्ष की रीत।
जितना बड़ा संघर्ष, उतनी बड़ी जित।

.......................................

सचिन दाभाडे

Tuesday, August 29, 2017

पेराल ते उगवेल...!




असे म्हणतात या जगात कुठल्याही व्यक्तिचा सन्मान त्याने आयुष्यात काय मिळवले यावरून होत नाही तर त्याने आयुष्यात काय दिले यावरून होतो. लोकांच्या यशात ज्याला हातभार लावता आला तो स्वतः यशाची एक पायरी मुळातच चढून गेलेला असतो, म्हणजे जेंव्हा तुम्ही एखाद्याला डोंगरावर चढण्यास मदत करता, तेंव्हा तुम्ही स्वत:ला ही आकाशाच्या जवळच शोधाल. आपण इतरांबद्दल चांगले बोलायला लागलो की याची सुरवात होते. लोकांबद्दल फ़क्त चांगले बोलायची इच्छा असून भागत नाही, तर तुमचा त्यांच्याबद्दल असलेला चांगला विचार त्यांना ऐकायला ही गेला पाहिजे. जसा जसा तुमचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोण बनत जाईल तसा तसा तुम्हाला मिळणाऱ्या वागणुकीचा दर्जा वाढत जाईल. म्हणजे लोकांनी आपल्या सोबत खुप छान वागाव अस एखाद्याला अतिशय निकडीचे वाटायला लागले असेल तर त्याला करावी लगणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, तसेच वागणे त्याने दुसऱ्यासोबत सुरु करणे होय; म्हणूनच एखादा स्वार्थी व्यक्ति जेवढा स्वताःकडून फसवला जात असेल तेवढा कुणीही फसवला जात नसेल या जगात...!

मदर तेरेसा सारख्या परदेशातुन आलेल्या विदुषीला हे सत्य किती स्पष्टपणे अवगत होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे गरीब, अपंग, स्त्रीया, अनाथ मुले यांच्या जीवनामध्ये आनंदाचे छोटे छोटे कण पेरण्यात गेले. पण त्याबदल्यात त्यांना मिळालेला आदर ही आपण पाहतो, जो कुणालाही मिळणे सोपे नाही. याचे कारण त्या पहिल्यापासूनच खूप आदरणीय होत्या म्हणून त्यांनी ते कार्य केले नाही, तर त्यांनी ते कार्य केले म्हणून त्यांना आदर मिळाला. बाबा आमटे हे आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यासाठी आयुष्यभर झटत होते आणि रोग्यांचा कुष्ठरोग बरा करताना एक दिवस त्यांना स्वतःलाच हा रोग झाला, अनेकांचे दुःख अंगावर घेऊन त्यांची मानोभावे सुश्रुषा करणारे बाबा आमटे आदरास पात्र झाले. ते काम त्यांनी स्वीकारले म्हणून ते आदरास पात्र झाले. म्हणून तुम्ही काय देता हे सगळ्या जास्त महत्वाचे.

अशा पद्धतीमधुन सर्जनशील नेतृत्व उभे करायचे असल्यास लोकानां तुम्ही त्यांच्या मागे आहात हा विश्वास देता आला पाहिजे आणि हा विश्वास देण्यासाठी प्रत्येकातील चांगले काय ते शोधता आल पाहिजे.चांगले ते शोधून वेळोवेळी प्रोत्साहन देता आले पाहिजे. चांगल्या प्रकारे आणि मनापासून केलेल्या प्रोत्साहानाला लोक आयुष्यभर सोडत नाही आणि दुसऱ्यामध्ये शोधलेली चूक आयुष्यभर तुम्हाला सोडत नाही. मनापासून केलेल्या कौतुकावर लोक वर्ष वर्ष काढतात हाच यातील सांगायचा मुद्दा. बर हे फ़क्त माणसांसाठीच नहीं तर यंत्रही बघा ना..वीज दिली की फ्रिज कूलिंग देतो, ट्यूब प्रकाश देतो.  गाड़ीला पेट्रोल दिले की ती आपल्याला प्रवास देते, निरिक्षण दिले की समज मिळते, कृती केली की अनुभव मिळतो. उगावणारया झाडाची प्रत ही, बी लावल्यापासून ते फळ हातात येईपर्यंत जी काळजी घेतली जाते त्यावर अवलंबून असते...

झाड़ लावले की फळ मिळते, पण मला झाड़ लावायचे नाही, मला फ़क्त फळ हवंय हे म्हणणे कसे वाटते...! हास्यास्पद वाटतेय ना ? वाटेलही, याचे कारण आपण त्याचे निरिक्षण करतो आणि मग तुलना करतो म्हणून हास्यास्पद वाटते. आता यासारखेच जर आपण आपल्या क्षमता आणि प्रयत्नांची तुलना आपल्या अपेक्षेशी केली, तर याहीपेक्षा खुप हास्यास्पद प्रकार हाताला लागण्याची शक्यता आहे. पण स्वताःवर हसणे जरा अवघड असल्याने आपण हा प्रयोग दुसऱ्यावर राबवण्यातच धन्यता मानतो.

एखाद्या झाडाला वाढवायचे असल्यास आपण त्याच्या आजूबाजूची जागा मोकळी करतो त्याला उंच वाढवायचे असल्यास बाजूच्या फांद्या कापून टाकतो म्हणजे पाणी आपोआप जे अस्तित्वात आहे त्याला जाते आणि झाड हव्या त्या आणि योग्य दिशेला वाढते. तुम्हाला समोरच्या च्या मनात काय वाढवायचं  आहे राग,प्रेम, आकस, विरोध, जे वाढवायचा आहे ते बोला, जे वाढवायचं नाही ते बोलण्यातून आणि वागण्यातून टाळा. आतून वाढ़ायचे असल्यास तुम्हाला जागा मोकळी करावी लागेल, आणि जे तुमच्याकडे आहे ते बाहेर द्यावे लागेल, दिले तर वाढ़ाल. स्वतःपाशी ठेवाल तर रद्दी होईल. म्हणुन वाढ़ायच की आयुष्यभर ओढायच हे तुम्हीच ठरवा..!


सचिन दाभाडे ... 

Friday, August 18, 2017

क्या समझे.... ?



आपली समज ही एकसंघ प्रक्रिया नाही ती वेगवेगळ्या लेवलमधे (स्तर) अस्तित्वात येते. माझी समज असलेल्या लेवल खाली देतोय त्या समजून घेऊ.

- आपल्याला सगळे समजते याची जाणीव होणे ही समजण्याची 'पहिली लेवल'.

- आपल्याला जे सगळे समजते तेवढेच दुसर्यालाही समजते हे समजण्याची 'दूसरी लेवल'

- जेवढे समजले तेवढे समजून घ्येउन समजदारीने वागायला सुरवात करणे ही समजण्याची 'तीसरी लेवल'.

- आपल्याला समजल्याप्रमाणे आपण पूर्णपणे वागतो आहोत असाच अट्टहास नसणे ही समजण्याची 'चौथी लेवल'.

- आपल्या वागण्याचा दूसरा चुकीचा अर्थ काढू शकतो हे समजून त्याच्याशी संवाद तुटू न देणे हे हे समजण्याची 'पाचवी लेवल'.

- आणि आपली एकूण समज ही जगाच्या एकूण समजेची छोटीशी समज आहे हे समजणे व् समजून घेण्याच्या प्रवासात प्रमाणिक पणे प्रयत्न करत राहणे ही 'शेवटची लेवल'.

या मी व्यक्त केलेल्या लेवल मधे कुणाला असे वाटले की; मला सर्वच समजते, त्याला आपण समजून घ्यावे...!

.................
सचिन दाभाडे





Tuesday, August 1, 2017

"आनंदनगरी"



काल आपल्या मुलीसोबत आनंदनगरीला गेलो होतो. एका दुकानासमोर मुलगी थांबली आणि दुकानातील खेळणी न्याहाळू लागली. ती बघत होती  म्हणून मी हि जरा इंटरेस्ट घेऊन बघायला लागलो सगळ्या खेळण्या मस्तच .. समोरच्या रॅकमध्ये हवा भरलेल्या रबराच्या बाहुल्या मांडून ठेवलेल्या. त्या अतिशय सुंदर, वेगवेगळ्या रंगच्या, आकाराच्या अगदी फुग्यासारख्याच. त्याना कितीही लोटले किंवा खाली पाडायचा प्रयत्न केल्यास त्या खालीतर जातात पण पुन्हा जसेच्या तसे उभ्या राहतात. त्याच्या तळाशी काहीतरी वजनदार असल्याने सगळी गंमत  होत असावी बहुदा.

काही कोपऱ्यातल्या रकान्यात चाविच्या गाड्याही होत्या, त्यांना चावी दिली की त्या काही अंतर वेगाने जातात आणि मग मध्येच थांबतात, त्यांना पुन्हा चालताना पहायच असल्यास पुन्हा आपल्याला त्यांच्या पर्यंत जावे लगते आणि पुन्हा चावी द्यावी लगते.

अतिशय आकर्षक आणि वेगवेगळ्या रंगाच्या शिट्या ही आडव्या दोरीला लटकवलेल्या होत्या, त्यांच्यात जेवढा वेळ हवा फुंकत रहा तेवढा वेळ वाजत राहणार, हवा फूंकने बंद..  वाजने बंद. यात काही पिपाण्या होत्या, काही बासरया, काही पेट्या तर काही भोंगेही आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे पियानो आलेले आहे, यात गाणे सेट केले कि फार डोके लावायची गरज नाही, प्रत्येकचे वेगवेगळे वैशिष्ट्ये.

काही शोभेची फुले ही अतिशय छान मांडून ठेवली होती यांचा सुगंध येत नाही, पण यांची नष्ट व्हायची भीतिही नसते, ही दिसायला खुप सुंदर होती आणि नेहमी तशीच सुंदर राहु शकत होती. काही रबरचे बॉल होते, त्यांना जेवढे जोरात जमिनीवर अदळले तेवढ जोरात ते उसळी मारुन वर येत होते.

माझी मुलगी हे सर्व सुंदर खेळणे बघून आनंदी ही झाली आणि गोंधळूनही गेली. शेवटी मलाच विचारले, मी यातील कुठली खेळणी घेऊ..सगळ्याच कश्या आकर्षक वाटताय, मी थोड़ कन्फ्यूज झालो. म्हंटल काय उत्तर द्यावे आता...!

एकाने मार्गदर्शन केले की बाजूला एका ठिकाणी काही ज्ञानी लोकांचा मेळावा चालू आहे. तिथे बरेच विचार मंथन चलते, तिथे कदाचित तुम्हाला यावर मार्ग मिळेल आणि तुमच्या मुलीला आवडेल आणि छान वाटणारे खेळणे घेता येईल.

सांगीतल्याप्रमाणे मी तिथे गेलो आणि अनेक उपलब्ध मार्गदर्शकांपैकी एकाला सर्व सांगितले आणि विचारले. त्याने आकाशाकडे बघत सांगितले, "तिला कुठालेच खेळणे घेऊन देऊ नकोस, फ़क्त चावी घेऊन दे"..

मी अवाक, आता झाली का पंचाईत, नुसती चावी, आणि त्यानं कस काम भागणार...! हे उत्तर थोडं अंगावर आल्यासारखे वाटले म्हणून समोर जाऊन आणखी एका ज्ञानी व्यक्तीला विचारावे असे ठरवले. पुढे गेलो आणि थोडा अस्वस्थ वाटणारा पण चेहऱ्यावर तेज असणाऱ्या एकाला आत्मविश्वास आणून विचारलेच. तो म्हणाला,  "ज्याच्या साठी इथे आला आहात ते करा आणि घरी जा" 

या उत्तराने राग आला पण स्वतःला सावरून मुलीचा हात पकडून तिथून निघालो आणि अस्वस्थपणे आनंदनगरीत फिरू लागलो. मुलगी आनंदनगरीमध्ये प्रचंड खेळली, खूप थकली आणि घरी जाऊन शांत झोपली. मी मात्र अनुत्तरित, तसाच या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिलो, रात्रभर ...!


. .  . . . . . . 
सचिन दाभाडे 



Sunday, July 30, 2017

कॉर्पोरेटचे "अभिमन्यू"





अष्टो प्रहर कष्ट करून नष्ट होणाऱ्यासाठी नवनिर्मिती हे स्वप्नच आहे. बऱ्याच जणांना नवनिर्मिती आणि पुनर्निर्मिती यामधील फरक कळता कळता आपबितीला सामोरे जावे लागते. म्हणून  क्षमतांचा अंदाज बांधने तसे अवघडच, त्यासाठी स्वतःला आजमावे लागते, भट्टीत झोकावे लागते, भूतकाळातील हस्तिदंती मनोऱ्यातुन भविष्याची गणिते बांधणाऱ्याला इतिहास डायबिटीस देतो.  खाताही येत नाही, आणि पाहताही येत नाही. क्षमता आहे हे नुसतं तुमच्या विचारांनाच माहित असून भागत नाही तर कृतीमधून ते व्यवस्थेच्या प्रत्ययाला ही यावे लागते. आपल्याला झालेली जाणीव ही आपल्या स्वतःच्या जेनेटिक्समधील आहे की फक्त फोनेटिक्समधील; की मग आजूबाजूचा प्रभाव गांजतोय. 'निखरना है तो बिखरना है' या तत्वात बसवण्यासाठी आपल्या  निर्णयाला धमक देता देता, क्षमतेला चमक देणे जमले पाहिजे. 

हे चेक करण्यासाठी चीनचा तत्ववेत्ता, लाओत्से २५०० वर्षांपूर्वी एक सूत्र सांगतोय "Without Darkness, there can be no Light." म्हणजे काय तर अंधार हा तुम्हाला प्रकाशाची जाणीव करून देणारा एकमेव मार्ग. बाहेरचा प्रकाश आतल्या अंधाराची जाणीव होऊ देत नाही आणि आतला प्रकाश बाहेरच्या अंधाराची जाणीव होऊ देत नाही म्हणून कुठला प्रकाश निवडायचा ते काळजीपूर्वक ठरवा.  करिअरच्या राजमार्गावर येण्यासाठी काही थाटामाटात तर काही रडत पडत कॉर्पोरेट, मोठमोठ्या बिसिनेस फर्म, व्यवस्थेयत प्रवेश मिळवतात; पण आपल्या इच्छा, क्षमता आणि कंपनीच्या अपेक्षा यांचा व्यवस्थित ताळेबंद बांधता न आल्याने काही घूसल्यावर आतमध्ये लढत राहतात, काही बाहेरच्या दिशेने वेगाने उचंबळून पुन्हा नकळत आतल्या दिशेने गिरकी घेतात आणि गिरक्याच घेत राहतात. काही आतील सूत्रे  हातात घेतात, सक्षम होतात, तर काही बाहेर येण्याच्या स्वप्नात आतमध्ये कष्ट करत राहतात .. शेवट पर्यंत ...! 
हे सर्व अभिमन्यू हेच आपल्या भारतीय कॉर्पोरेट इंडस्ट्रीचे निर्धारकही आहेत आणि अडचणीही. 

बरेच लोक फिल्मी स्टईलने चक्रव्यूह तोडतात आणि मासोळीसारखे बाहेर येऊन तरफडत राहतात. धड बाहेरही थांबता येत नाही, धड आतही परतता येत नाही, हे अभिमन्यू म्हणजे बाहेर पडून एका स्वरचित चक्रव्यूव्हाची शिकार होणारे नावाचेच शरीफ. ही मंडळी जास्त प्रमाणात १९८० ते २००० च्या काळात जन्मलेली, यातली बरीच मिल्लेनिअलही आहे, म्हणजे जे शिकले ते अप्लाय करता येत नाही.जे अप्लाय करावे लागले ते पूर्ण शिकता आले नाही. जेवढे शिकले ते सोडता येत नाही आणि नवीन शिकण्यासाठी वेळ ही नाही .. ज्यांना वेळ आहे त्यांची मानसिकता नाही आणि ज्यांची मानसिकता आहे त्यांना प्रापंचिकता....! एकूण काय तर बऱ्यापैकी गोंधळच... यातून बाहेर पडायचे म्हणजे नेमके कशातून बाहेर पडायचे हा येणाऱ्या दशकातील मोठा प्रश्न...!       

याचे उत्तर कॉलेक्टिव्ह पातळीवर कंपन्याच शोधताय. अमेरिकन थियरी "Y" ही एम्प्लॉयी यांना कामचुकार आणि आळशी समजून कामाची प्लॅनींग करते  आणि म्हणून माणसाच्या शक्तीची आणि प्रेरणेची समजच नकारात्मक आहे.  ज्यामध्ये कामे सोपववताना जबरदस्ती आणि इच्छा विचारात न  घेणे क्रमप्राप्तच आहे. याउलट जपानी उधोगपती आणि विचारवंतांनी आणलेली थेअरी "x" ही अमेरिकन मॅनेजमेंट आणि मानसिकतेच्या बरेच पाऊले पुढे चालून गेलीय. या थिअरीने माणसे ही आळशी आणि कामचुकार बनण्याची करणीमिमांसा केली आहे आणि त्याआधारावरच कामाचे ठिकाण उत्साही, सुंदर क्रिएटिव्ह असले तर लोकांना  कामचे ठिकाण आपलेसे  होईल, आणि कामाच्या पद्धती बदलल्या की लोक अधिक क्रियाशील आणि प्रोडक्टीव्ह होतील , याची  रचना करून आपल्या उद्योगाला थेअरी "Y", म्हणजेच अमेरिकन कंपन्यांच्या नियोजन पद्धतीच्या कचाट्यातून सोडवले. जॅपनीझ लोकांच्या या "पीपल" आणि "क्वालिटी" मॅनॅजमेण्टच्या कल्पनाच पश्चिमेकडील देशांच्या नियोजनाच्या सर्व तत्वांना आणि गृहीतकांना आव्हान देणाऱ्या होत्या. म्हणूनच याचा मध्य साधणाऱ्या थेअरी "Z" ची मांडणी करावी लागली जी नियोजनातील दोन्ही पद्धतीतील मिश्रण आहे. 

ही नवीन थेअरी म्हणजेच आपल्यामधील एक्सलेन्सचा शोध आणि नवनिर्मितीच्या सर्वोच्य शिखराकडे सतत प्रवास. यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे प्रयत्न विविध उद्योग योग्य प्रमाणात आपल्या एम्पल्योईंना सक्षम करण्यासाठी करत आहे; त्याचे उदाहरण म्हणजे कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त  होत असणारे learning & development, organizational excellence team,employee relation team अश्या प्रकारचे विभाग म्हणजे ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटला या सर्वांच्या गरजेची झालेली जाणीव. 

कुठल्याही क्षेत्रात असा, पण क्षमतेचा शोध घेत राहणे आणि त्याचा विकास करणे हे एम्प्लॉयी आणि एम्पल्योऐर या  दोघांसाठी आता  महत्वपूर्ण बनले आहे. येणाऱ्या १० वर्षात आश्या गोंधळलेल्या आणि कुंपणावरील मनुष्यबळाचे विस्थापन थांबवायचे असल्यास एम्प्लॉयी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे आणि व्यक्ती जिथे आहे तिथेच त्याला हवे असणारे विश्व् निर्माण करुन कॉस्ट वाचवून सर्व संसाधने पुरवण्याचे आव्हान येणाऱ्या काळात कंपन्या आणि व्यक्तींसमोर आहे. हा स्थित्यंतराचा काळ आहे हे जितके खरे तितकेच हे ही खरे की हा सुवर्णमध्य साधण्यासाठी वेळही हीच योग्य, अन्यथा हे आधुनिक अभिमन्यू हेच आपल्या देशी नियोजनापुढील सर्वात मोठे आवाहन ठरत राहतील.   


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade.com
Sachin.14d@gmail.com
8390130362     










          

Thursday, July 27, 2017

माणसाचा देव व्हावा..........!



रात्री हायवे वरून जातांना  एक भली मोठी जाहिरात  एका मोठ्या बोर्डवर  झळकत होती. जेवढी बिल्डिंग मोठी होती तिच्या कमीत कमी अर्ध्या आकाराचा हा बोर्ड तिच्यावर उभा केलेला होता. मी साधारणतः रात्री १० ला उशिराने घरी जात होतो आजूबाजूला काळाकुट्ट अंधार, रस्त्यावरील लाईटही  मिणमिणत्या प्रकाशत  आपला कसाबसा जीव काढत होते, पण त्याही अंधारात त्या उंच बिल्डींग वरील भला मोठा बोर्ड माझे लक्ष वेधून घेत होता. बोर्डच्या वरील बाजूने तीन मोठ्या लोखंडी रॉड लटकावून त्यावर दोन कोपऱ्यावर दोन आणि मधात एक असे तीन लाईट बोर्डाकडे तोंड करून फिक्स करण्यात आले होते. गंमत अशी होती कि त्या लाइटमुळे आजूबाजूचे काही दिसत नव्हते पण तो बोर्ड मात्र स्पष्ट दिसत होता.

माझ्या आणि बोर्डामध्ये बरेच अंतर होते, आणखी बरेच बोर्डही रस्त्यावर लावलेले होते, पण त्यातला एकही मला दिसला नाही आणि याला मी टाळू शकलो नाही. माझ्या आणि त्या मार्केटिंग बोर्ड मधील अंधार चिरत माझी नजर कुठल्याही अडचणीशिवाय त्याबोर्डापर्यंत पोहचू शकत होती. त्या बोर्डानी माझ्या आणि त्याच्या मधील भरून राहिलेला अंधार दूर करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्यांनी एकाच काळजी घेतली, या तीनही लाईटचा फोकस फक्त बोर्डावरचा पडेल याची.

प्रचंड अंधार आपल्या आणि सूर्यामध्ये असतानाही तो आपल्याला दिसतो,नव्हे आपल्या डोळ्यांनी बघताही येत नाही एवढ्या प्रकाशाने तळतळतो, कारण तो प्रकाशाने आधी स्वत जळतो. आपल्याला प्रकाशित करावे हा त्याचा हेतूही नाही आणि गरजही नाही, तो फक्त त्याचे काम करतो. आपण स्वतःहोऊन त्याच्याकडून प्रकाशित होऊन घेतो. दुसऱ्याला प्रकाशित करण्याच्या प्रयत्नात स्वतःतील अंधकार मिटवण्याचीही जबाबदारी घ्या ... एकाच करा स्वयंप्रकाशित व्हा...! अश्या स्वयंप्रकाशित लोकांचे जत्थे हजारो सूर्य निर्माण करतील आणि आणि प्रकाशाचे स्वप्नं पाहतील.

कुणीतरी लिहून ठेवलय;

स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी...

स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा..........




Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate Trainer
Director-ASK Training Solution
Web- www.sachindabhade.com
Mob - 8390130362
ask@sachindabhade.com
sachin.14d@gmail.com

Thursday, February 9, 2017

मार्काची परीक्षा..!





१०, १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेतील मार्क आणि तिथल्या प्रमाणपत्राचा विचार नक्की करा, पण फार ओझे मनावर घेण्याची गरज नाही. व्यक्तीच्या विकासासाठी आणि खरया अर्थाने सक्षम बनण्यासाठी त्याला शारीरिक (फिजिकल), मानसिक (मेंटल), भावनिक (इमोशनल) आणि आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) अश्या चार  प्रकारच्या ज्ञानाची गरज असते आणि शालेय जीवनात विध्यार्थी फक्त मानसिकरित्या तयार होतो. त्याच्या भावनिक आणि अध्यात्मिक ज्ञानाची  गरज पूर्ण करण्यासाठी शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात तशी फारशी व्यवस्था नाही.ती गरज तुमच्या वेळोवेळच्या निरीक्षणातून आणि रिस्क घेण्याच्या क्षमतेतून सिद्ध होणार.

म्हणजे शालेय जीवनातील मिळालेले ज्ञान तुम्हाला नोकरीला लागण्यासाठीची मानसिक तयारी पूर्ण करणार, पण बाकीच्या ३ म्हणजे फिजिकल,इमोशनल, स्पिरिच्युअल प्रकार हे प्रत्येकाला वयक्तिक पातळीवर विकसित करायचे आहे आणि हे शाळा कॉलेज मध्ये नाही तर दैनंदिन जीवनाच्या अनुभवातून, नवीन शिकण्याच्या इच्छेतून मिळते, अर्थात याची परीक्षाही तिथल्या तिथेच  होणार व तिथल्या तिथेच रिझल्ट ही मिळणार. काहींना हे ३ ज्ञानाचे प्रकार आपल्यामध्ये आहेत की नाही याची माहिती असते, तर काहीं या ज्ञानाबद्दलच शेवटपर्यंत अनभिज्ञ..! म्हणून १०, १२ वी सारख्या परीक्षेला कसौटी समजून गोंधळात पडू नका, हा फक्त एंट्री फॉर्म आहे, कसौटी आहे ती पुढे आणि त्या कसौटीची गंम्मत ही की, ती तुम्हाला जिंकावण्यासाठीच तुमच्या समोर येणार, ना की तुम्हाला अज्ञानी ठरवण्यासाठी किंवा तुम्हाला चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी. म्हणजे घटना घडली आणि तुम्हीं अडखळले, गोंधळले, आपटले, किंवा तुटले तरी तुमच्या खात्यात गुण  जमा होणार. म्हणजे प्रत्येक घटना तुम्हाला 'गुण'  देऊन 'गुणी' बनवणार. हे गुण सतत मिळत राहणार, वाढत राहणार जो पर्यंत तुम्ही मैदानात आहेत तोपर्यंत आणि तोपर्यंत तुम्ही फेल नाही, जोपर्यंत तुम्ही मैदानात ...!  त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील ८०% यश या ३ हि ज्ञानाने व्यापले आहे.

१० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यानी परीक्षेचा अभ्यास करा, बाकी किती मार्क घ्यायचे ?, कोणापेक्ष्या  जास्त  घ्यायचे ? याचा  विचार करून कारण नसताना स्वतःच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावण्याची, काहीही गरज नाही. कारण जास्त  मार्कवाले  आणि कमी मार्कवाले....! पहिला, दुसरा आणि  शेवटचाही, तुम्ही सगळे…, इथेच…, याच जगात काम करण्यासाठी राहणार आहात. या प्लानेटच्या बाहेर तुम्ही लोक जाणार नाहीत, एवढे तर  नक्की आहे.

पास झाल्यावर कामाला तुम्ही सगळेच लागणार, हे ही तितकेच खरे. महत्वाचे हे की तिथे काम करताना 80% परिस्थितीमध्ये तुम्हाला शाळेतील शिक्षण व परीक्षेतील मार्क कामी येणार नाही.  ते हाताळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न व अनुभवाच्या कठोर चौकटीतून जावे लागणार आहे आणि ते तुम्हाला खरया मैदानात आल्याशिवाय कळणार नाही. सोबतच सक्षम असण्याऱ्या व्यक्तीचा सहवास, अनुभवी लोकांचे मार्गदर्शन, यशस्वी लोकांचे विचार तुमचे ज्ञान वाढवणार, ते स्वीकारण्यासाठी भविष्यात तुम्ही कसे तयार होता हा महत्वाचा प्रश्न आहे.

शालेय जीवनातील यश जरी महत्वाचे असले तरी इमोशनल आणि स्पिरिच्युअल योग्यता नसेल किंवा निर्माण झाली नाही, तर तुम्हाला मिळालेले यश टिकवणे आणि वाढवणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा आणि त्यातील मार्क हेच सर्व नाही, तर ती एक छोटीशी पायरी आहे. "ओप्रा विन्फ्रे" ही अशी स्त्री आहे, जिचे लहानपण अतिशय खडतर वातावरणातून आणि अनुभवातून गेले. एका ब्लॅक कुटुंबात जन्म झाल्यावर  ९ ते १४ वर्षाच्या अतिशय कोवळ्या वयात शारीरिक शोषणातून तिला जावे लागले, त्यानंतर १४ व्या वर्षीच तिच कुमारी माता होणे, हे दुर्दैवी होत. ही दाहकता समजण्यापलीकडची होती, पण हे एवढ्यावरच थांबणारे नव्हते, आणखी इतिहास घडायाचा बाकी होता. सूर्याच्या प्रकाशाला आव्हान देणारी व्यक्ती होण्यासाठीचे सर्व झगडे पूर्ण करायचे होते. एखादया व्यक्तीला आयुष्यातून उठण्यासाठी एवढा संघर्ष खूप आहे... पण संपेल ती ओप्रा कसली, आपल्या दुःखाला आणि संघर्षाला जगण्याची ढाल करून, रडत न बसता, ती तिला आवडणाऱ्या कामात सतत झोकून देत राहिली, पडत पडत उभी राहिली आणि वयाच्या ३२ व्या वर्षी जगातील सगळ्यात मोठ्या मीडिया शो ची होस्ट बनली, दैदिप्यमान यश मिळवले, कर्तुत्वाला ही लाजवेल असे काही मिळवले. जगातल्या सर्व क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वाना तिच्या शोमध्ये जाणे हे प्रतिष्ठेचे झाले, मुख्य देशातल्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपासून ते प्रसिद्ध कलाकार सामाजिक कार्यकर्ते हे या प्रोग्राममध्ये सहभाग घेण्यास आतुर व्हायला लागले. त्या प्रोग्रॅमचे नाव होते "द ओप्रा विन्फ्रे शो". आजच्या घडीला जगातला सगळ्यात प्रसिद्ध शो.

उच्च शिक्षणातनंतरही बरेच लोक अडचणीच्या क्षणी ढासाळतात आणि कमावलेले सर्व क्षणात गमावून बसतात, त्यामुळे मानसिकरीत्या उच्च शिक्षित जरी झालात, पण भावनिक रित्या तयार नसाल, तर भीती ही तुम्हाला ते करण्यापासून नेहमी थांबवेल जे तुम्ही यशस्वी होण्यासाठी केलेच पाहिजे. ओप्राची भावनिक साक्षरता, अतिशय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगातूनही उठून उभे राहण्याची तिची भावनिक क्षमता, हीच तिच्या यशाची शिल्पकार ठरली.

शिक्षणानंतर मानसिकरित्या एखाद्या जॉब साठी स्वतःला तयार करतांना राहिलेल्या तीन महत्वाच्या ज्ञानाला गवसणी घालायला विसरू नका, कारण या चार चाकांवरच तुमच्या  भविष्यातील यशाचा प्रवास श्यक्य आहे, एक चाकावर नाही .


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade. com
Sachin.14d@gmail.com
8390130362