काल आपल्या मुलीसोबत
आनंदनगरीला गेलो होतो. एका दुकानासमोर मुलगी थांबली आणि दुकानातील खेळणी न्याहाळू लागली.
ती बघत होती म्हणून मी हि जरा इंटरेस्ट घेऊन
बघायला लागलो सगळ्या खेळण्या मस्तच .. समोरच्या रॅकमध्ये हवा भरलेल्या रबराच्या बाहुल्या
मांडून ठेवलेल्या. त्या अतिशय सुंदर, वेगवेगळ्या रंगच्या, आकाराच्या अगदी फुग्यासारख्याच.
त्याना कितीही लोटले किंवा खाली पाडायचा प्रयत्न केल्यास त्या खालीतर जातात पण पुन्हा
जसेच्या तसे उभ्या राहतात. त्याच्या तळाशी काहीतरी वजनदार असल्याने सगळी गंमत होत असावी बहुदा.
काही कोपऱ्यातल्या रकान्यात
चाविच्या गाड्याही होत्या, त्यांना चावी दिली की त्या काही अंतर वेगाने जातात आणि
मग मध्येच थांबतात, त्यांना पुन्हा चालताना पहायच असल्यास पुन्हा आपल्याला
त्यांच्या पर्यंत जावे लगते आणि पुन्हा चावी द्यावी लगते.
अतिशय आकर्षक आणि वेगवेगळ्या
रंगाच्या शिट्या ही आडव्या दोरीला लटकवलेल्या होत्या, त्यांच्यात जेवढा वेळ
हवा फुंकत रहा तेवढा वेळ वाजत राहणार, हवा फूंकने बंद.. वाजने बंद. यात काही पिपाण्या होत्या, काही बासरया, काही पेट्या तर काही
भोंगेही आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे पियानो आलेले आहे, यात गाणे सेट केले कि
फार डोके लावायची गरज नाही, प्रत्येकचे वेगवेगळे वैशिष्ट्ये.
काही शोभेची फुले ही
अतिशय छान मांडून ठेवली होती यांचा सुगंध येत नाही, पण यांची नष्ट व्हायची
भीतिही नसते, ही दिसायला खुप सुंदर होती आणि नेहमी तशीच सुंदर राहु
शकत होती. काही रबरचे बॉल होते, त्यांना जेवढे जोरात जमिनीवर अदळले तेवढ जोरात ते उसळी
मारुन वर येत होते.
माझी मुलगी हे सर्व सुंदर
खेळणे बघून आनंदी ही झाली आणि गोंधळूनही गेली. शेवटी मलाच विचारले, मी यातील कुठली खेळणी
घेऊ..? सगळ्याच कश्या आकर्षक
वाटताय, मी थोड़ कन्फ्यूज झालो. म्हंटल काय उत्तर द्यावे आता...!
एकाने मार्गदर्शन केले
की बाजूला एका ठिकाणी काही ज्ञानी लोकांचा मेळावा चालू आहे. तिथे बरेच विचार मंथन चलते, तिथे कदाचित तुम्हाला
यावर मार्ग मिळेल आणि तुमच्या मुलीला आवडेल आणि छान वाटणारे खेळणे घेता येईल.
सांगीतल्याप्रमाणे मी
तिथे गेलो आणि अनेक उपलब्ध मार्गदर्शकांपैकी एकाला सर्व सांगितले आणि विचारले. त्याने
आकाशाकडे बघत सांगितले, "तिला कुठालेच
खेळणे घेऊन देऊ नकोस, फ़क्त चावी घेऊन दे"..
मी अवाक, आता झाली का पंचाईत, नुसती चावी, आणि त्यानं कस काम भागणार...!
हे उत्तर थोडं अंगावर आल्यासारखे वाटले म्हणून समोर जाऊन आणखी एका ज्ञानी व्यक्तीला
विचारावे असे ठरवले. पुढे गेलो आणि थोडा अस्वस्थ वाटणारा पण चेहऱ्यावर तेज असणाऱ्या
एकाला आत्मविश्वास आणून विचारलेच. तो म्हणाला, "ज्याच्या साठी इथे आला आहात ते करा आणि घरी जा"
या उत्तराने राग आला पण स्वतःला सावरून मुलीचा हात पकडून तिथून निघालो आणि अस्वस्थपणे आनंदनगरीत फिरू लागलो. मुलगी आनंदनगरीमध्ये प्रचंड खेळली, खूप थकली आणि घरी जाऊन शांत झोपली. मी मात्र अनुत्तरित, तसाच या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिलो, रात्रभर ...!
या उत्तराने राग आला पण स्वतःला सावरून मुलीचा हात पकडून तिथून निघालो आणि अस्वस्थपणे आनंदनगरीत फिरू लागलो. मुलगी आनंदनगरीमध्ये प्रचंड खेळली, खूप थकली आणि घरी जाऊन शांत झोपली. मी मात्र अनुत्तरित, तसाच या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिलो, रात्रभर ...!
. . . . . . . .
सचिन दाभाडे
खूपच सुंदर आणि विचारप्रवृत्त करणारे लिखाण ....
ReplyDeleteThank you sir..
ReplyDelete