बॉक्सिगच्या पिंजऱ्यात घामाने पूर्णपणे ओलेचिम्ब झालेले असताना समोरचा बॉक्सर आपल्या आव्हानात्मक हावभावातून तुम्हाला सतत समज देत असतो की त्याला जिंकणे हे अशक्य, त्याचे मसल्स प्रयेक क्षणाला तुम्हाला वास्तवतेची जाण करून देत असतात, तुमच्या स्वप्नाच्या मर्यादा ठरवत असतात...!
खरच प्रश्न पडतो, कसा घडला असेल मोहम्मद अली? प्रतिस्पर्ध्याच्या एक एक हालचाली ओळखणारा, प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलाचे अंदाज लावणारा, त्यांच्या प्रत्येक ठोशाची क्षमता परखणारा, त्यांच्या ऊर्जेतील चढ उतार ओळखून आपल्या हल्ल्याची बांधणी करणारा अली आणि आणखी काय काय ...! कदाचित आपल्या आकलनापलीकडला, म्हणूनच जगज्जेता.....!
कमालीचा "focused approach" हाच तुम्हाला घडवेल, नाहीतर आपल्या उद्दिष्टा कड़े झालेले थोड़े दुर्लक्ष तुम्हाला वेळ आल्यावर रडवेल.
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment