Monday, November 7, 2016

माकडे आणि आनंद



माकडे आणि आनंद

काल एका माकडाची गोष्ट वाचनात आली, एका अरुंद तोंड असलेल्या घागरीमधून माकड काही पदार्थ काढायला लागते, पण घागरीचे तोंड अरुंद असल्याने त्याचे हात आणि दोन्ही वस्तू एकाच वेळेला बाहेर येणे अशक्य होऊन बसते. अर्थात माकडाला हे लक्षात न आल्याने माकडाने हातातील वस्तू सोडत नाही आणि ते तिथेच अडकून राहते. काही वेळाने डोंबारी येऊन त्याला पकडतो. अर्थात हा डोंबाऱ्याचा सापळा माकडाच्या लक्षात न येण्यापाठीमागे 'फक्त हाताला लागलेले काहीही करून पाहिजेच आणि हाताला लागले ते आपलेच'. अशी अपेक्षा, जी त्याला आहे त्या परिस्थितीत सुरक्षा ही देत नाही, व हाताला लागलेले आपले तेवढे काढून बाहेर पडणे ही जमू देत नाही. आशा परिस्थितीत माणसे माकड बनण्याची प्रक्रिया फार वेगात होत राहते.

एखाद्या घटनेतून आनंद किती घ्यावा व किती सोडावे हे कळणे खूप गरजे आहे, ते न समजल्याने आपले अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. असे हे माकड बनण्यापासून वाचण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा "महत्तम सामायिक आनंद" आपल्याला कळणे म्हणूनच खूप गरजेचे आहे. आनंदाच्या कल्पना आणि आपल्यासोबत घडणाऱ्या घटना यांच्यात खूप फरक झाल्याने नेहमीच निराशावादी राहणे हे बऱ्याच व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनून जाते. बरं आनंद आयुष्यात आणायचा तरी, तो कुठल्यातरी विशिष्ट अशा धोरणातूनच येईल अशी अपेक्षा निश्चितपणे चुकीचा प्लॅटफॉर्म तयार करते. उदा. "मी तेंव्हा आनंदी होईन जेंव्हा ...!" अशा अटींवर आनंद अवलंबून ठेवल्या जातो आणि मग तो जेंव्हा आलाय असे ठामपणे वाटते, तेंव्हा कोणीच कुठलीही तडजोड करायला तयार नसतो. आता हाताला लागलेले सर्व आपलेच आहे आणि यातील काही सोडणे म्हणजे आपण आपल्या आनंदासाठी सुरवातीला ठेवलेली अट मोडणे असे वाटल्याने त्यावर आपलाच अधिकार आहे असे ठामपणे अहममिका तयार होते आणि यामुळे, एखादा दुसराही याच घटनेतून तेवढाच आनंद घेणार असतो जेवढा तुम्ही, ही गंमत आपण सहजपणे विसरतो, असे केल्याने येणाऱ्या सर्व विसंवादामधून बाहेर पडण्याच्या शक्यता धूसर होत जातात.

घटनेतून येणारा आनंद ओरबाडण्याच्या नादात आपण हे विसरतो की या मडक्याचे तोंड अरुंद आहे याच्या बाहेर येण्यासाठी तेवढेच हातात ठेवावे लागेल ज्याद्वारे या नातेरूपी माडक्याच्या तोंडातून कुठल्याही प्रतिरोधाशिवाय बाहेर पडता येईल, अन्यथा पूर्ण एकटाच बाहेर काढण्याच्या नादात एकतर हात आतमध्ये अडकून पडेल, नाहीतर मडक्याचे तोंड फोडावे लागेल, अन्यथा कुणीतरी डोंबारी येऊन पकडेल आणि मग आयुष्यभर त्याच्या तालावर नाचावे लागेल. काही लोक हे समंजसपणे ओळखून, प्रत्येक घटनेतून आपला असलेला आनंद तेवढा काढून, दुसऱ्याचा आनंदी राहण्याचा अधिकार आणि त्याच्या अस्तित्वाची स्वीकृती मडक्यात ठेऊन बाहेर पडतात व पुढील आनंदासाठी सज्ज होतात.

आनंद हा तुमच्या आयुष्यात या प्रकारे येणार नाही ज्याप्रकारे एखादी बस बसस्टॉपवर येते, तर तुम्ही ठरवले तिथे तो सुरु होईल, त्यासाठी कुठल्याही अटी ठेवू नका आनंदाची वाट बघत बसू नका,कारण वाट बघत असताना भूतकाळातील नकार आणि भविष्यातील अनिश्चितता तुम्हाला अस्वस्थ करेल
"एका कुठल्या गुरु ने आपल्या शिष्याला सांगितले कि तुला तुला आनंद मिळवण्याचे सिक्रेट सांगतो ते म्हणजे

"आनंदी रहा "
कारण आनंदी राहणे ही घटना नाही तर सवय आहे.


सचिन दाभाडे
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com












क्रियावादी व्हा ...!


आपल्याला अस्वस्थ होण्यापाठीमागे आणि दुखावण्यामध्ये आमुक व्यक्तीचा प्रभाव आहे किंवा कुणाचा हात आहे, असे म्हंटल्यावर डोक्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे "एक व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली किंवा मग तमुक एखादी व्यक्ती माझ्यासोबत तशी वागल्यामुळे मी दुखावलो". कुणाच्याही कृतिमुळे आपण दुखावल्या जात नसतो तर समोरच्यांच्या भूमिकेला आणि क्रियेला आपण दिलेला प्रतिसाद व निवडलेली "प्रतिक्रिया" च भावनिक आणि मानसिकरित्या आपल्याला जास्त अडचणीत आणत असते. एलिनार रुझ्झवेल्ट ने म्हंटल्याप्रमाणे "तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुम्हाला दुखावू शकत नाही" हे यातील वास्तव आहे.
या प्रतिक्रियावादाच्या बाहेर या..! यात आपण वर्षानुवर्षे अडकून पडलोय, आपल्या प्रतिक्रिया आपण स्वतः निवडा, ती स्थलकालाच्या बंधनात येणार नाही याची काळजी घ्या ...! कुणी एक व्यक्ती, संस्था,घटना ही तुमच्या विचार प्रक्रियेच्या मुळाशी येऊ न देता सकारात्मक विचारधाराच जेवढ्या येतील ते पहा आणि आपल्या इच्छा त्याचा बळी न ठरू देण्यासाठी प्रयत्नशीलशील रहा. प्रतिक्रियेऐवजी क्रियावादी व्हा.
स्वतःचे नियम आखा, ते वैश्विक ऊर्जेच्या आणि प्रेरणेच्या तत्वाशी मिळते जुळते आहे याचा सतत मागोवा घेत रहा. नियमांच्या, मानसिक बंधनाच्या आणि भावनिक अवलंबनाच्या चौकटी तोडा, कुणी बोलले म्हणून बोलू नका, कुणी केले म्हणून करू नका, कुणी रागावले म्हणून रागावू नका, कुणी हसले म्हणून फसू नका, आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही म्हणून रुसू नका, जे काय करायचे ते करा, पण ते फक्त स्वतःच्या क्रियेतून करा प्रतिक्रियेतून नाही. डोक्यातील विचार फार काळ डोक्यात राहत नाही म्हणून त्याला कृतिकार्यक्रमाची जोड द्या, सोबत कुणी आहे ही अपेक्षा ठेऊन कृतिकार्यक्रम परावलंबी बनवू नका. त्याला मूलभूत विचारांची बैठक द्या. उद्या नावाची संकल्पना आळशी लोकांच्या डोक्यातून आलेलं पीक आहे त्याला बाजारात केंव्हाच विकता येणार नाही हे पक्के लक्षात ठेवा.
एवढे सगळे माहित असूनही मनात भीती असतेच, पाय अडखळताच शेवटी, कुणाचेतरी चित्र डोळ्यासमोर येतेच शेवटी, प्रेरणेच्या ओढ्यावर बांध आपण घालतोच शेवटी, भीतीचा प्रभाव वाहण्याच्या स्वभावाला भारी पडतोच शेवटी.
एक कराच ! बाहेर या घराच्या, आकाशाकडे बघा...! ते अनंत आहे, वाऱ्याकडे बघा...! ते संथ आहे, जमिनीकडे बघा...! ती विशाल आहे, वेळेकडे बघा...! ती चल आहे, यातून काही समजते का तेही बघा. हे जर नाही बघता आले तर एक करा, तुमच्या समोर असलेल्या व्यक्तींकडे बघा, ज्या तुमच्या प्रभावापासून मुक्त आहे आणि आता स्वतःकडे बघा, किती भीती, किती गोंधळ, किती संकुचितता, आणि अस्वस्थता आणि अभूतपूर्व असा विरोधाभास तुमच्या अंतरंगात, चाक एकीकडे आणि वासे एकीकडे हे शक्य नाही, म्हणूनच स्वतःला एकाच प्रश्न विचारा...
हे आणखी किती दिवस ?
उत्तर सापडले तर ठीक, नाही तर मी आहेच .......

सचिन दाभाडे
ASK Training Solution


इछीत ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी जशी मनामध्ये प्रबळ इच्छाशक्तीच नाही तर, आपल्या भूमिकेला समजून प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची गर्दी आपल्या आजूबाजूला असावी असे प्रत्येक यशस्वी व्यक्तीला, नेतृत्वाला, उद्योगधंद्यात मोठे होणाऱ्या किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमठऊ पाहणाऱ्या व्यक्तीला वाटत असते. तसेच ती सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ही वाटत असते. असे असतांना खूप मोठे मोठे प्रयत्न संबंधित व्यक्तीकडून होतांना मी नेहमीच पाहतो, पण त्याचा इलाज मात्र होतांना दिसत नाही. गरज, (दुखणे) एकीकडे आणि मलम दुसरीकडेच लावतांना लोकांचा आटापीटा अखंड चालू असतो.
एकीकडे जेंव्हा लाखो, हजारोंचे मॉब कुणाच्या बोलण्याला फॉलो करत असतात, तर कुठे लोकांच्याच जोरावर मोठमोठया कंपन्या उभ्या राहतात, एवढेच नाही तर आपल्या शहरात, गावात, गल्लीत, घरात असेही व्यक्ती असतात, जे प्रत्येकाच्या प्रशंसेला, कौतुकाला पात्र असतात, त्यांच्या सोबत बोलण्यासाठी लोक त्यांच्या आजूबाजूला नेहमीच घुटमळत असतात. असं नेमकं काय करतात ही लोकं, की जेणेकरून; सामान्य माणसाला जे स्वप्नवत वाटते, पण हे लोक मात्र लीलया करून टाकतात आणि ते ही कुठला गाजावाजा न करता. हेच करायला आपण गेलो की नाकी नऊ, तोंडावर पडणे, इच्छित प्रतिसाद न मिळणे, असे का होते ?.
नातेसंबंध विकसित करणे ही खरंच एवढी अवघड बाब आहे का ? तर नक्कीच नाही... पण बऱ्याच साध्या साध्या गोष्टी समजून न घेतल्याने रिलेशनशिप विकसित करणे अवघड होऊन बसते.सामान्य अशा बाबी न समजून घेता आपण आपली ऊर्जा, पैसा, वेळ, नको त्या ठिकाणी पणाला लावतो. जेंव्हा निकाल काही वेगळाच येतो तेंव्हा आपण पुन्हा अनावश्यक स्पर्धेसाठी कंबर कसायला लागतो, जी भविष्यात तुमचा आनंद, वेळ, आणि समाधान काढून घेणार असते. हा बूमरँग कसा टाळता येईल...!
या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरांची सुरवात माझ्या "Empowering Future" या फ्री सेमिनारच्या आजच्या दुसऱ्या सेशन पासून केली.
ASK Training Solution च्या ऑफिसामध्ये झालेला हा सेमिनार या सर्व प्रश्नाच्या उत्तराची कोंडी फोडणारा होता.
सहभागी झालेल्यांचे मनापासून आभार आणि पुढील Saturday साठी सर्वांना निमंत्रण. 



Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com


संगणकासमोर बसलेल्या व्यक्तीला हा पूर्ण विश्वास असतो की आपल्या डोक्यात असलेल्या कुठल्याही विचाराला तो वास्तवात आणु शकतो. हे वास्तव म्हणजे दूसरे तीसरे काही नसून, ते सर्व विचार तो कागदावर उतरवु शकतो, एवढेच. परंतु विचारांना वास्तवात आणण्यासाठी विचारपूर्वक केलेल्या सातत्यपूर्ण अशा मेहनतीची जोड आवश्यकच असते. 'एका जागी बसून आनंदाची केलेली फ़क्त कल्पना आणि तो मिळविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे'. 'मी केंव्हातरी पर्यटनाला जाणार आणि खुप मजा करणार' किंवा 'त्यासाठीची प्लानिंग सुरु करणे', 'माझे अपूर्ण शिक्षण मी कधीतरी पूर्ण करणार' किंवा 'त्यासाठी मी कुठे प्रवेश घेऊ शकतो याची तयारी प्रत्यक्षात सुरु करणे'.
वरील वाक्यांचे दोन्ही भाग दिसायला जरी सारखे दिसत असले तरी ते सारखे नाहीत, जो पर्यंत दुसऱ्या भागाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत वास्तवात काहीच बदलत नाही. हे जग टाइपराइटर नहीं, इथे तुम्हाला जर निकाल हवा असेल तर डोक्यात असलेल्या कथा फ़क्त कागदावर टाइप करुन भागणाऱ नाही तर वास्तवात उतरावण्यासाठी पावले उचलावे लागतील, अन्यथा पेपरवर टाइप केलेल्या मजकुराने न जग बदलते, न आपण.



Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com