हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतांना ती आपल्या हातात पोहचेपर्यंत विभत्स होऊ नये याची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे समजायचे असल्यास, मधाच्या पोळ्यातून मध काढणाऱ्याला काळजीपूर्वक बघा...! त्याच्या आणि त्याला हव्या असलेल्या अमृततुल्य चवीच्या मधामध्ये, फक्त एका डंखामध्ये महाभयंकर वेदना देण्याची ताकत असणाऱ्या मधमाश्या असतात. त्यावेदनेचा विचारच आपल्याला मधाच्या चवीपासून खूप दूर घेऊन जाऊ शकतो. त्यांना बाजूला केल्याशिवाय मध मिळणे केवळ अशक्यच ! त्यांना दुखवून (hurt) मारून मध गोळा करायचा प्रयत्न केल्यास किंवा कुठल्याही आक्रमक मार्गाने असा प्रयत्न झाल्यास हव्या असलेल्या मधाची प्रत (Quality) खराब होण्याची शक्यताही पूर्ण. तेव्हा हे जिकरीचे काम ज्या लीलया पद्धतीने केले जाते ते पाहणे मजेशीर आहे.
माणसांना हे लागू करतांना, हवा असलेला निकाल मिळवायचा असेल तर समीक्षा, विरोध, तक्रार करणे घातक आणि विरोधाभासी आहे हे पक्के लक्षात घ्या .गुन्हा केलेला व्यक्ती आपला गुन्हा मान्य करून जे वाट्याला येईल ते स्वीकार करतांना कधी आपण पहिला आहे का ?... तो नेहमी स्वतःच्या कृत्याची कारणीमिमांसा देतांना दिसेल अथवा त्यामागचे त्याचे शास्त्र सांगेल, तेव्हा आपण केलेली समीक्षा ही त्याची अपरिहार्यता असते, निवड नाही. उदाहरण म्हणून बघितले तर; कुणाला बदलवण्यासाठी आपण केलेले विधान हे "समीक्षा, विरोध, तक्रार" या चौकटीत येत असेल तर व्यक्तीमध्ये बदल होणे श्यक्य तर नाहीच पण याचा दुसरा नकारात्मक परिणाम होणार तो म्हणजे व्यक्तींशी असलेला भावनात्मक संपर्क धोक्यात येईल, ही "कार्नेजी" यांची मांडणी, नेटवर्किंग आणि रिलेशनशिप डेव्हलोपमेंट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोलाची आहे.
त्यामुळे बदल घडवण्यासाठी एखाद्याच्या नकारात्मक बाबीवर बोलून त्या नियंत्रित करण्यापेक्षा चांगल्या बाबींना सतत दिलेली मान्यता आणि प्रोत्साहन जास्त उपयुक्त आहे, "स्कीनर' या विख्यात मानसशास्त्रज्ञाने आपल्या जनावरांवर केलेल्या संशोधनात हे सिद्ध केलेय की आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल शिक्षा मिळालेल्या जनावरांपेक्षा, चांगल्या वागण्यासाठी प्रशंसा मिळालेल्या जनावरांमध्ये शिकण्याचा वेग हा जलद आणि लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते. आणि हे मनुष्यावरही लागू होते हे नंतर झालेल्या संशोधनातून सिद्ध झालाय....
सचिन दाभाडे
ASK Training Solution
ASK Training Solution
No comments:
Post a Comment