Friday, June 3, 2016


पैश्याचे दोन उपयोग..! एक म्हणजे त्याच्यातुन स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टी विकत घेऊन समाधानी होणे. म्हणजे आपल्याकडे असलेल्या पैश्यातून हवी ती फळे, किंवा कपडे ई. घेणे आणि दूसरे म्हणजे पैश्यातून अशी वस्तु घेणे जी पुन्हा पैसा निर्माण करू शकेल उदा. एखादे घर घेणे, किंवा व्यवसायात गुंतवणे इ. म्हणजे बघा; काही लोकानां संत्री आवडतात म्हणून ते विकत घेऊन खातात तर काही लोक संत्र्याची झाडे लावतात, त्यातच त्यांचे समाधान. झाड़ लाउन ते आपला आनंद पुनरुत्पादित करतात व त्यासाठी आपल्याकडे असलेला वेळ आणि पैसाही काही प्रमाणात खर्च करतात. यात गुंतवलेल्या पैश्यातून समाधान मिळेलच याची शाश्वती नाही, परंतु येणाऱ्या पिढ्यासाठी ही सर्वांगाने सकारात्मक गुंतवणूक असते आणि हो तीही त्यांनीच करावी ज्यांना गमवायची भीति नाही, अन्यथा प्रत्येक पावलावर, हे करून काही चूक तर नाही केली ना...! हा विचार कुठेच् पोहचू देत नाही.
पहिला प्रकार हा आपल्या शारीरिक गरजेशी (consumptive need) असलेल्या समाधानाशी संबंधित आहे तर दूसरा प्रकार हा पैसा खर्च करुण पुनरुत्पादित (reproductive) करण्याशी संबंधित. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या जागेला आपण किती 'मोबादला' म्हणून परत करत असतो, याचा विचार एक व्यवहारिक व्यक्तिमत्व म्हणून प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. म्हणजे मला माझ्या व्यवसायाने काय दिले हे जितके महत्वाचे, त्या ही पेक्षा मी माझ्या व्यवसायला काय दिले हे आहे.
हे जाणून घेण्याचे काही मुलभुत मानक आहेत, जसे माझे काम श्रीमंत होणे, ते लोकांमध्ये मान्यता पावणे आणि हे तेव्हाच शक्य, जेव्हा कामाला 'मीळवण्यापेक्षा' जास्त 'दिले' जाईल. आपण आपल्या कामाला अथवा व्यवसायाला परत न देऊ शकण्याचे दोनच कारणे; एक तर तुम्ही चुकीच्या जागेवर आहात अथवा तुम्हाला तुमच्या कामाला परत देण्याची मानसिकता/इच्छा/क्षमता नाही.

सचिन दाभाडे.....

No comments:

Post a Comment