एक विचार करुन बघा, तुम्ही आता जे काम करत आहात किंवा ज्यामध्ये आपण स्वतःच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत अशी सर्व कामे बंद पडली... एकदम डेड एन्ड..!
काय होईल..!
बघा विचार करून...!
मग आजुबाजुला छोट्या मोठ्या दुकानामधुन, रस्त्यावर काम करत असलेल्या लोकांकडे बघने सुरु होईल आणि मग लक्षात येईल की अरे आशी आणखी कोणती कामे आहेत जी मला जमु शकतात, आणि बऱ्यापैकी हाताला भिती लागेल. आपण ज्या कामात कुशल आहोत ते करत असताना इतर कामे शिकण्याची किती जण तयारी करतात. 'एकाग्रता' म्हणून बऱ्याच सहज सोप्या गोष्टी शिकण्याचे टाळणे, आणि याचे कारण काय तर अपयश, किंवा जे ठरवले आहे त्या पासून दूर जाण्याची भिती !
जॉन मेसन ने आपल्या पुस्तकात अमेरिकेचे राष्ट्रपति थिओडोर रूज़वेल्ट ने म्हंटलेले एक वाक्य सांगीतलेय, "Far better it is to dare mighty things to win glorious triumphs, even though checkered by failure than to rank with those poor spirits who neither enjoy much nor suffer much because they live in the great twilight that knows not victory or defeat"
मेसन पुढे म्हणतो की, one of the riskiest thing you can do in your life is to take too many precautions and never have any failures or mistakes.
सचिन दाभाडे....